Saturday, August 6, 2011



शिरवळपासून ५ कि.मी अंतरावर सातारा मार्गावर चौपाळा या ठिकाणी जीर्ण झालेली ही पाणपोई.याच्या पश्चिमेला पांडवदरा आणि मांढरदेवीचे मंदिर आहे.तेथे दर्शनासाठी जाणार्‍या श्रद्धाळूना विश्रांती मिळावी यासाठी हे विश्रांतीस्थान बांधले असावे.


त्यांत पश्चिमेच्या भिंतीला लागून दोन दगडी बांधणीचे रांजण जमीनीत पुरलेल्या अवस्थेत आहेत.या रांजणात भक्तांनी दान द्यावे अशी प्रथा होती.मंडपाचे दगड आता झिजले असून ते पडण्याच्या मार्गावर आहेत.या पुरातन वास्तूचे जतन करताना कोणीही दिसत नाही.सरकारने,पुराणवस्तू खात्याने आणि नागरिकांनी एक ऐतिहासिक वास्तू म्हणून याचे जतन करणे आवश्यक आहे.